बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
डोर्लेवाडी येथे अखंड राम नाम जप,पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेली भव्य शोभायात्रा, कीर्तन,प्रवचन,निरूपण, महाआरती, अन्नदान,आदी धार्मिक कार्यक्रमाने डोर्लेवाडी येथे आयोजित केलेले तीन दिवसीय २५वे रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय चैतन्य जप प्रकल्प शिबिराची उत्साहात सांगता झाली.
गोंदवलेकर महाराज चैतन्य प्रकल्प महाराष्ट्र राज्य यांचे वतीने शुक्रवारपासून तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी राज्यभरातून हजारो भाविक ब्रह्मचैतन्य नगरी डोर्लेवाडी येथे उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर आरती सत्संग श्रीरामरक्षा पठण,सामुदायिक नामस्मरण,आणि चैतन्य जप प्रकल्प कार्यकर्त्यांची व सेवेकऱ्यांची बैठक पार पडली. शनिवारी रोजी सकाळी पहाटे काकड आरतीने अखंड जपमाळ प्रारंभ झाला. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली मिरवणुकीत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या जिवंत प्रतिमा साकारण्यात आले होत्या.
शोभायात्रा संपन्न झाल्यानंतर समर्थ भक्त शरद बुवा रामदासी जपप्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील भाऊ देशमुख .भाग्यवान जपकार माणिक आनंदा जाधव. डोर्लेवाडीच्या सरपंच सुप्रिया नाळे. स्थानिक शिबिर प्रमुख मनोज नाळे. लक्ष्मण आसबे,भारत गावडे. प्रशांत नाना सातव. अजित काटे.तानाजी काटे.गणपत जगताप गुरुजी, अर्जुन जाधव,आगवणे सर,आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी रामदास बुवा यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सामुदायिक नामस्मरण व जपकारांची मनोगते झाली. सायंकाळी लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे सांप्रदायिक वारकरी कीर्तन संपन्न झाल्यानंतर जप प्रकल्प शिबिरे झालेल्या १ ते २४ वर्षातील पदाधिकारी आणि जपकार यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी भजन सेवा आणि हरी जागर करण्यात आला रविवारी पहाटे काकड आरती झाल्यानंतर बाळासाहेब महाराज नाळे डोर्लेवाडी यांचे प्रवचन झाले त्यानंतर जपकाराची आध्यात्मिक व सामाजिक बांधिलकी या विषयावर ज्ञानेश्वर दुधाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्याध्यक्ष धैर्यशील भाऊ देशमुख यांचे निरूपण संपन्न झाले त्यामध्ये रामनामाचे महत्त्व. गोंदवलेकर महाराज यांचे जीवन चरित्र. व त्यांचे कार्य जपकारांनी करावयाचे नियम साधना सामाजिक कार्य याबद्दल चिंतन मांडले.
दुपारी आरती व महाप्रसाद झाल्यानंतर खतनाम राष्ट्रीय कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर यांचे सुंदर असे नारदीय कीर्तन झाले त्यांना तितकीच सुंदर साथ संगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे आणि हार्मोनियम निखिल कुलकर्णी यांनी दिली. त्यानंतर सामुदायिक नामस्मरण अखंड माळेची सांगता झाली श्रींची आरती व पसायदान आणि शिबिराची सांगता झाली या शिबिरात सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते भर पाऊस असताना सुद्धा महाराजांच्यावर निष्ठा असणारे रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीन दिवसीय शिबिराचा आनंद लुटला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मनोज नाळे वैभव भुजबळ आकाश नाळे अनिल नाळे अभिजीत नाळे शुभम भाऊ निखिल नाळे दशरथ गंधारे हरिदास जायकर हनुमंत मदने सोमनाथ बनकर सुजित कालगावकर किरण कालगावकर आदींनी रात्रीचा दिवस करून संपूर्ण परिसरात फरशी टाकून बैठक व्यवस्था निर्माण केली तसेच सलग तीन दिवस पाऊस असताना सुद्धा खूप मेहनत घेऊन चोख व्यवस्था करून पंचविसावे रोप्य महोत्सवी शिबिर यशस्वी केले.

