मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
आज मुंबईत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांच्या समवेत लोकनेते शुगरचे चेअरमन तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या गळ्यात भाजपाचे उपरणे घालत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश दिला.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारभाऊ गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी इत्यादी उपस्थित होते.

