बंडी शेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील नुकसान ग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास 32 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली होती ही आर्थिक मदत राज्यातील 253 तालुक्यातील महसूल मंडळातील नुकसानग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली होती.
परंतु पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळातील शेतकऱ्यांना या नुकसानग्रस्त व पूरग्रस्त यादीतून वगळण्यात आले होते.
त्यामुळे दोन दिवसापासून या महसूल सर्कल मंडळातील शेतकरी चिंताग्रस्त होते त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार अभिजित आबा पाटील,खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील तसेच महसुलाधिकारी प्रांतसाहेब सचिन इथापे, तहसीलदार सचिन लगुटे यांच्या पर्यंत हा विषय फोन द्वारे तसेच निवेदन देऊन बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळाचा नुकसानग्रस्त व पूरग्रस्त यादी समावेश करावा व या मंडळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती.
बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळातील प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला होता त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते त्याचाच एक भाग म्हणून आज 10 ऑक्टोबर रोजी पंढरपूर पुणे रोडवरील बाजीराव च्या विहिरीजवळील चौगुले वस्तीजवळ शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
भाळवणी व भडीशेगाव ही दोन मंडळातील पाऊस ग्रस्त व पूर ग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची मागणी करण्याकरिता उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर तहसील कार्यालय येथे आंदोलन केले होते.
त्यामुळे रस्त्यावरती एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या त्यावेळेस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फोन द्वारे या आंदोलन शेतकऱ्यांशी संवाद साधला व बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळातील शेतकऱ्यांचा नुकसान ग्रस्त व पुरग्रस्त यादीत समावेश केला जाईल अशा पद्धतीची आश्वासन दिले. तसेच तहसीलदार सचिन लगुटे ही या घटनास्थळावरती आल्यानंतर शेतकऱ्यांनी बंडी शेगाव महसूल सर्कल मंडळाचा समावेश नुकसानग्रस्त व पूरग्रस्त यादीत लवकरात लवकर समावेश करावा अशा पद्धतीची मागणी केली त्यानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते.
तसेच बंदोबस्तासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट ,पीएसआय संतोष जगताप पीएसआय ज्योती बनवाड, पोलीस अधिकारी मुलानी, पठाण, आप्पासाहेब करचे, गंगुबाई वाघमोडे, पोलीस चालक सुनील लोंढे शेळवे पोलीस पाटील ॲड.नवनाथ पाटील वाखरीचे बाळू शेंडे कवठळीच्या माधुरी नागटिळक वाडीकुरोलीची अमर काळे पाटील बंडीशेगावचे कस्तुरे पिराजी कुरोलीचे शरद कौलगे पाटील या ठिकाणी उपस्थित होते.