मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
सेंट टेरेसा हायस्कूल वांद्रे मुंबई येथे नुकताच शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम सादर केले.पालक शिक्षक संघाच्या वतीने पालकांनी शिक्षक स्टाफरूम मध्ये शिक्षकांसाठी खास फुलांची सजावट रांगोळी काढली होती.
शिक्षकांसाठी खास मास चे आयोजन करण्यात आले होते.विविध खेळ, स्पॉट प्रायझेस, नाचगाणी, धम्माल नृत्य सादर करण्यात आले.
यावेळी शाळेचे मॅनेजर फादर हेन्री, मुख्याध्यापक फादर शिनोय, काऊन्सिलर फादर जोस, ॲडमिनिस्ट्रेटिव ब्रदर अक्षित, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षिका लिंडा अँथनी, विधार्थी, पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेतील इयत्ता दहावी कमिटीने कार्यक्रमाची यशस्वी आखणी केली होती.

