जनता दरबार; माझं काम होणार !
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज पंढरपूर पंचायत समिती येथे जनतेशी संवाद साधत, त्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी आणि विविध कल्पना ‘जनता दरबार’च्या माध्यमातून आमदार अभिजित आबा पाटील यांनी समजून घेतल्या.
यावेळी आ.अभिजित पाटील म्हणाले की जनता दरबाराला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘माझं काम होणार’ हा माझ्या नागरिकांमध्ये दिसलेला विश्वास आणि विविध विषयांवरील कल्पना जाणून तर घेतल्याच शिवाय त्यासंदर्भातील पाठपुरावाही सुरु केला आहे.ग्रामसेवक यांच्याकडून घरकुल योजना, जलजीवन अशा विविध योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी आ.पाटील म्हणाले की नागरीक आणि प्रशासन यातील दुवा म्हणून काम करत असताना नागरीकांचे प्रश्न सुटावेत आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात या उद्देशाने आपण सुरु केलेल्या या जनता दरबाराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडवताना मिळणारे समाधान मोठे असते. असे आ. अभिजित पाटील म्हणाले.

