भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक ०९/०९/२०२५ वार मंगळवार रोजी चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माजी प्राचार्य एच.आर जमदाडे यांच्या पत्नी व जि.प.प्रा.शाळा केसकरवाडी मुख्याध्यापिका ए.एम.गुजरे यांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधुन ५ सप्टेबर २०२५ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
यानिमित्ताने वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर भाळवणी प्रशालेच्या वतीने शिक्षिका अलका गुजरे यांचा पुष्पगुच्छ हार,शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे सचिव एच.आर.जमदाडे प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका उपस्थित होते.

