पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) अंतर्गत असलेल्या एम.बी.ए. विभागामधील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी ऋतुजा संजय फाळके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत येणार्या महाविद्यालयांमध्ये एम.बी.ए. द्वितीय वर्षातील मानव संसाधन व्यवस्थापन (एच.आर.एम.) या विषयाच्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाते. या स्पर्धात्मक युगात स्वेरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीत नंबर लागतो. यंदा देखील स्वेरीने ही परंपरा कायम राखली आहे. स्वेरी मध्ये एम.बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ऋतुजा संजय फाळके यांनी मानव संसाधन व्यवस्थापन (एच.आर.एम.) या विषयाच्या परीक्षेत प्रथम आल्याबद्दल श्रीमती अलका काकडे यांच्या तर्फे असलेल्या ‘श्री. विश्वास विनायक काकडे सुवर्णपदक’ हा नामांकित पुरस्कार मिळविला. हा सन्मान ऋतुजा यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्तेच्या शिक्षण प्रणालीचा अदभूत प्रत्यय देणारा आहे. ऋतुजा यांच्या उल्लेखनीय यशामुळे स्वेरी महाविद्यालयाच्या एम.बी.ए. विभागाचे नाव उज्वल झाले आहे, हे मात्र निश्चित. त्यांना एम.बी.ए. विभागातील प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. ऋतुजा यांनी स्वेरीच्या वसतिगृहात राहून अभ्यास केला. रात्र अभ्यासिके बरोबरच, ग्रंथालयातील आवश्यक पुस्तके व संदर्भ ग्रंथ यामुळे अधिक अभ्यास करता आला. कॅम्पस मधील आदरयुक्त शिस्त व संस्कार याचाही ऋतुजा यांना फायदा झाला. त्यामुळे कठोर परिश्रम करून मिळविलेले हे यश इतर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. ऋतुजा फाळके यांना राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
यावेळी माजी राज्यपाल आचार्य देवव्रत, गोवा शिक्षण परिषदेचे डॉ.गोप्साल मुगेराया, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ. मिनल भोरे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी ऋतुजा फाळके यांचे अभिनंदन केले आहे.