भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे शासकीय चित्रकला परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रामध्ये फळवणी, पिलीव ,गादेगाव, तांदुळवाडी, गार्डी, कोर्टी, महूद या शाळा मधील विद्यार्थी परीक्षेसाठी सहभागी होतात. या सर्व शाळा मधील चित्रकला विषय शिकवणारे शिक्षकांची न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी या विद्यालयात मीटिंग संपन्न झाली.
या मीटिंगमध्ये विद्यालयाचे केंद्र संचालक प्राचार्य के.डी.शिंदे व उपमुख्याध्यापक मोरे मॅडम, परीक्षक बेसिकराव यांनी मार्गदर्शन केले. तसेच परीक्षेचे केंद्रप्रमुख कला शिक्षक तुकाराम खरात यांनी परीक्षे संबंधित सूचना दिल्या.
या परीक्षेमध्ये एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी 452 विद्यार्थी प्रविष्ट झाली होते. त्यासाठी 18 ब्लॉक तयार करण्यात आले होते. तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी 248 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यासाठी दहा ब्लॉक तयार करण्यात आले होते. ही परीक्षा 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025 या काळात होती. पावसाचे वातावरण असताना सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी या विद्यालयाने ही परीक्षा अतिशय उत्तम रित्या पार पाडली.
या परीक्षेसाठी विद्यालयातील बनसोडे एस बी हे सहाय्यक म्हणून काम पाहत होते. तसेच कुमरे सर , शिंदे सर ग्रंथपाल, ठाकर सर, अवघडे सर, चव्हाण सर, निकम सर, सचिन पाटील यांनी विशेष सहकार्य केले