पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग व इनोवेशन क्लब (IC) यांच्या संयुक्त विद्यमाने "डिजिटल लॉजिक डिझाइनची ओळख : गेट्सपासून सर्किटपर्यंत" या विषयावर दिनांक २६ सप्टेंबर रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानामध्ये डॉ. एस. जी. कंबालिमठ यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल लॉजिक डिझाइनच्या मूलभूत संकल्पना समजावून सांगितल्या. त्यांनी बेसिक लॉजिक गेट्स, त्यांचे कार्य व उपयोग स्पष्ट करून, बूलियन अल्जेब्रा व K-Map च्या साहाय्याने समीकरणे सोडवण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवले.
तसेच, हाफ ॲडर, फुल ॲडर, मल्टीप्लेक्सर, डिकोडर यांसारख्या कॉम्बिनेशनल सर्किट्सचे डिझाइन व कार्य स्पष्ट केले. त्यानंतर फ्लिप-फ्लॉप्स, काउंटर्स, शिफ्ट रेजिस्टर्स यांसारख्या सीक्वेन्शियल सर्किट्सची संकल्पना व डिझाइन प्रक्रिया उलगडून सांगण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल सर्किट्सच्या डिझाइन प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली.
या कार्यक्रमाची माहिती देताना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अशा प्रकारची उपयुक्त व्याख्याने आयोजित केली जातात.
प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यावेळी सांगितले की, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना रोजगाराच्या संधींमध्ये मदत होण्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात.या कार्यक्रमात तृतीय वर्षात शिकणाऱ्या ७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अमृता माळी, प्रा. अंजली पिसे, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

