सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
"यंदाचा दसरा, दिवाळी – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी" ड्रीम फाउंडेशन चा उपक्रम राबवण्यात आला आहे.मुसळधार पावसाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. घरं वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाले, पिकं वाचली नाहीत… बळीराजा अक्षरशः हतबल झालाय.
आजवर हा शेतकरी आपल्याला अन्नधान्य देत आला. आता त्याच दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करायचं ठरवलं आहे.आम्ही सोलापूर मधून गरजू शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनी कार्यक्रमातील इतर सत्कार खर्च कमी करून आम्ही मदत करणार आहोत तसेच शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही आहोत सोबत
नुसत लढ म्हणा
यावर संवाद कार्यक्रम व पहिल्या टप्पातील 251 लोकांना मदत करणार आहेत तसेच पुढे नियोजन बद्द पद्धतीने मदत पेरणीसाठी हरभरा/मका बियाणे तसेच एक महिनाभर पुरेल असं “किराणा किट” तसेच उपयुक्त असे टॉवेल,चादर,बेडशीट,प्रथमोपचार किट देणार आहोत. या किटमध्ये असे साहित्य असेल हुरडा ज्वारी बियाणे हरभरा/मका बियाणे (एका एकरासाठी)तांदूळ, रवा, बेसन पिठ साखर, गूळ, तेल, मीठ,शेंगदाणे, फरसाण, बिस्कीट चरुमुरे,कडक भाकरी पाकीट,शेंगा चटणी कांदा,बटाटे,लसूण, साबण, कोलगेट
आम्हाला पैसा नको, थेट वस्तूरूप मदत हवी आहे.सोलापूर मधील विविध भागातून ही मदत गोळा केली जाईल आणि थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल.चला, आपण सारे मिळून या दिवाळीत बळीराजाच्या घरीही आनंदाचा दिवा लावूया.कारण शेतकरी वाचला तरच गावं वाचतील… आणि गावं वाचली तरच देश वाचेल.
संपर्क काशीनाथ भतागुणकी मो 9890948388 सतीश पाटील मो 7219099955 बसव संगम शेतकरी गट मो 9834306337 ड्रीम अकॅडमी मो 8275728388 राजमाता जिजाऊ भाकरी उद्योग संगीता मॅडम मो 8484952020 वरील पैकी कोणत्याही नंबरवर संपर्क साधून आपली मदत करू शकता किंवा आपण स्वतः उपस्थित राहून मदत देऊ शकता.