सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व क्लिक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.
विद्यापीठाच्या संगणकशास्त्र संकुलातील सायबर क्लब ऑफिसर तृप्ती पवार व श्रुती जंगलगी या विद्यार्थ्यांनी १ले ड्रीम सोलापूर पर्यटन जागर संमेलन २०२५ या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दाखवून सायबर सुरक्षततेची माहिती दिली.
सोशल मीडिया अकाउंटला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणे , व मजबूत पासवर्ड कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील अनेक लोक हे सायबर फ्रॉडचे बळी पडले असून, विद्यार्थ्यांनी घरातील नागरिकांची जनजागृती करावी. सरकारने अनेक योजना सुरू केल्या असून, यामध्ये फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीदेखील मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्या आहेत. वेगवेगळे ॲप तयार करून ओटीपी घेऊन नागरिकांच्या खात्यातील रक्कम हडप करतात.
चुकीच्या वेबसाईटवर सर्च केल्यास नुकसान होते. असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांना सजग व सतर्क करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आशा प्रकारे आजच्या ऑनलाईन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकी बद्दल उदाहरणाद्वारे माहिती दिली. यावेळी अध्यक्षीय स्थानावर असलेले सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले