पाटण प्रतिनिधी तेज न्यूज
भाजपा केंद्र व महाराष्ट्र राज्य पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे अभियान अंतर्गत याचा लाभ सर्व गरीब लोकांना मोफत देण्यात आला."स्वस्थ नारी सशक्त परिवार "या अभियान मोहिमेअंतर्गत" प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगिरी" व श्री गजानन सेवा मंडळ व कै. के. बी. मोरे मोफत वाचनालय पेठ शिवापूर येथील मारुती मंदिर "येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य सत्यजितसिंह पाटणकर व युवा नेते याज्ञसिंह पाटणकर व पाटण तालुका भाजपा अध्यक्ष नंदकुमार सुर्वे .यांच्या सहकार्याने .व प्रमुख उपस्थितीत बापू फुटाणे , शशिकांत प्रभाळे नथुराम हिरवे , गोरख प्रभाळे रवींद्र नाझरे, दादा डांगे , पांडुरंग नथुराम साळुंखे,मंडळाचे अध्यक्ष संजय हिरवे , वैद्यकीय अधिकारी ननावरे व त्यांचा सर्व स्टाफ यांच्या उपस्थितीत होता .
यावेळी डोंगर व दुर्गम विभागातील अनेक वृद्ध महिला .वृद्ध पुरुष. व तरुण-तरुणी यांना शुगर व बीपी यांची तपासणी व लगेच रिपोर्ट व गोळ्या औषधे मोफत देण्यात आली. तसेच भाजपा केंद्र व महाराष्ट्र राज्य पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे अभियान अंतर्गत याचा लाभ सर्व गरीब लोकांना मोफत देण्यात आला.