पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक 23/09 /2025 ला मुंबई येथील बाबासाहेब डहाणूकर सभागृह, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हाऊस ,येथे पार पडला
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री ललितजी गांधी राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. मंगल प्रभातजी लोढा राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्यासह महासंघाच्या अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या प्रदेश सहसचिवपदी रुई तालुका इंदापूर भाजपा, पुणे जिल्हा व्यापार आघाडीचे अध्यक्ष प्रविणकुमार शहा यांची निवड करण्यात आली.
महासंघाने दिलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडू असे प्रविणकुमार शहा यांनी सांगितले प्रविणकुमार शहा यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.