नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
इंग्रजाचे कर्दनकाळ आणि आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास व्यवस्थापक प्रमोद कोलपते , सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, यांच्यासह उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

