पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
हा मुलगा दिनांक 4/9/2025 ला हरवला होता .तशी तक्रार घेऊन लागलीच सदर मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक रेखा घनवट, पोलीस उप निरीक्षक विरसेन पाटील, पोलीस हवालदार ताठे व चालक पोलीस हवालदार लोंढे असे सरकारी वाहणाने हद्दीत रवाना झाले.
सदर मुलाच्या राहत्या परिसरात, नातेवाईक, मित्र इत्यादी ठिकाणी त्याचा शोध घेतला, विचारपूस केली पण तो मिळून आला नाही. त्या नंतर आम्ही सर्व विठलं मंदिर परिसर पाहिला असता सदर बालक हा नामदेव पायरीवर मिळून आला.
तक्रार प्राप्त झाल्या पासून अवघ्या 2 तासात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी सदर बालका चा शोध लावून त्यास सुखरूप त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
या घटनेबद्दल पोलीस निरीक्षक रेखा घनवट व पोलीस अधिकाऱ्यांचे मुलाच्या आई-वडिलांनी आभार मानून धन्यवाद व्यक्त केले या घटनेमुळे परिसरातील पालकांच्या कडून पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांचे अभिनंदन केले जात आहे.