भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री अकॅडमी येथील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वही पेन देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याविषयी सविस्तर वृत्त असे की येथील अकॅडमी मध्ये आर्यन दत्तात्रय माळवदे हा विद्यार्थी कोरोनाच्या काळात ऑनलाईन स्कॉलरशिपचे क्लासेस करीत होता. या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले. त्यामुळे या विद्यार्थ्यास शासकीय स्कॉलरशिप प्राप्त झाली. या विद्यार्थ्यांनी आपल्या स्कॉलरशिप मधील रकमेतून गरजू गरीब विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वही व पेनचे वाटप केले.
यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, एलआयसी चे विकास अधिकारी बजरंग चौगुले, सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत देशपांडे, सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे, डॉ. नवनाथ खांडेकर,बाळासाहेब कापसे, प्रा.डी एस माळवदे, शहाजी जाधव, प्रशांत माळवदे, अकॅडमी चे संचालक प्रवीण लिंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आभार शिक्षक रणजीत लोखंडे यांनी मानले

