माळशिरस प्रतिनिधी संजय निंबाळकर तेज न्यूज
आयडियल पत्रकार संघटना (दिल्ली) ची राष्ट्रीय अधिवेशन आयोजन बाबत राष्ट्रीय संपर्कप्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत तर राष्ट्रीय अध्यक्ष अजयजी मिश्रा आणि केंदीय महासचिव सूर्यकांतजी कदम, केंद्रीय संयुक्त सचिव जमुना चव्हाण, मुंबई ईस्ट अध्यक्ष सुरेश जयस्वाल, पालघर जिल्हा सचिव रुचिसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव येथे बैठक संपन्न झाली.
बैठकीत धुळे, नंदुरबार , जळगांव प्रभारी पदी डॉ. बी बी भोसले (भडगाव) तर जळगांव जिल्हा प्रभारी पदी अशोक चौधरी (वरखेडी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

