पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२५ परीक्षेत वसंतराव काळे आय.टी.आय. कॉलेजचे प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय कॉलेज मधून पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील यांत्रिक मोटार गाडी या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2025 या परीक्षेत कु.शुभम नामदेव फरतडे याणे 99.66% गुण मिळवून पुणे विभागात प्रथम क्रमांक संपादन केला तसेच विजतंत्री या व्यवसाय ट्रेड मध्ये कु. गोरक्षनाथ शिवाजी देठे याणे 99% गुण मिळवून पुणे विभागात प्रथम क्रमांक संपादन केला.कोपा या ट्रेड मध्ये कुमारी. पायल राघू रितुंड हिने 99% गुण मिळवून पुणे विभागात प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच फिटर या ट्रेड मध्ये कु. रोहित गणेश पवार याणे 97.83% गुण मिळवून पुणे विभागात प्रथम क्रमांक संपादन केला व सोलर टेक्नीशियन (इलेक्ट्रिकल) या ट्रेड मध्ये कु. रुद्रनाथ आबा आयरे याणे 98.33% गुण मिळवून पुणे विभागात प्रथम क्रमांक संपादन केला.
सोलापूर जिल्ह्यामध्ये शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री,फिटर, कोपा, सोलर टेक्निशन या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थीनी प्रथम,द्वितीय व तृतीय असे तीनही क्रमांक संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना सर्व निदेशकांनी विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव वसंतराव काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे गुरुजी व आय.टी.आय.चे प्राचार्य संतोष गुळवे व निदेशक यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले.

