पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर ते पुणे ई बससेवा सुरू करावी मागणी आगार प्रमुख यांचेकडे ग्राहक पंचायतीने केली होती त्याप्रमाणे ई बससेवा सुरू झाल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी सांगितले.
पंढरपूर येथे चार्जिंग स्टेशन पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी पंढरपूर आगाराला ई बस मिळाल्या नसल्याने बससेवा सुरू करता येत नव्हती. ई बस मिळाव्यात म्हणून ग्राहक पंचायतीने महामंडळाच्या अध्यक्षांकडे मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून पंढरपूर आगाराला प्राधान्याने अकरा ई बस मिळाल्या परंतु पुण्यात चार्जिंग करण्यासाठी अडचणी येत होत्या.तेथेही संपर्क करून ती सोय उपलब्ध झाली.त्याप्रमाणे पुण्यासाठी फलटण मार्गे ई बस सेवा सुरू झाली आहे.
त्यापैकी काही बसेस करकंब- टेंभुर्णी-इंदापूर मार्गे पुणे अशा सोडाव्यात ही ग्राहक पंचायतीची मागणीही लवकरच पुर्ण होईल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, प्रांत सदस्य विनोद भरते,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, संतोष उपाध्ये, यांनी व्यक्त केली आहे.या बस सेवेमध्ये सर्व प्रकारच्या सवलती मिळणार आहेत तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
वेळा- पंढरपूर पुणे पहाटे ६,७,८,९,१०,११
दुपारी २,३,४,५,६,
पुणे पंढरपूर सकाळी ६,८,९,१० ११
व दुपारी ३,४,५,६,८,९

