मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
आज मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीना-माढा उपसा सिंचन योजनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.अशी माहिती माढा विधान सभेचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी दिली आहे.
यावेळी आ.अभिजित पाटील म्हणाले की बैठकीत माढा तालुक्यातील तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगाव, कुर्डू, अंबड, पिंपळखुटे या सात गावांचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत अधिवेशनामध्ये झालेल्या लक्षवेधी व बैठकीच्या चर्चेच्या अनुषंगाने बैठक झाली.
तरी या सात गावांचा समावेश करण्यास मान्यता देऊन, तिसऱ्या सुप्रमा मध्ये घेण्याबाबत यावर सकारात्मक चर्चा केली, लवकरच शासन निर्णय काढण्याचे आदेश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. असे आ.पाटील यांनी सांगितले.

