मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील, असे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या प्रश्नांसंदर्भात विधानभवन येथे आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटलांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६५ करणे, पोलीस पाटलांसंदर्भातील तक्रारीची चौकशी उपविभागीय अधिकारी स्तरावर करणे, रिक्त पदाची भरती व अन्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.

