लातूर प्रतिनिधी तेज न्यूज
ओबीसी बांधव भरत महादेव कराड रा-वांगदरी, तालुका-रेणापूर, जिल्हा-लातूर या ओबीसी बांधवांनी आताच नुकताच निघालेला हैदराबाद गॅजेटच्या जीआर ला कंटाळून दि.10/09/205 रोजी आपल्या ओबीसी बांधवांचे काही खरं नाही, हे मनात विचार घेऊन मांजरा नदीच्या डॅम वर जाऊन वरून पाण्यात उडी मारली व आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्याच्या परिवाराला सुख समाधानी आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अंत्यविधी आज दिनांक 11 /9/ 2025 दुपारी 2 वाजता वांगदरी, तालुका-रेणापूर, जिल्हा-लातूर येथे झाले.
आपले हक्क आणि अधिकार आपण लढून वाचवू, प्राण देऊन नव्हे. जशास तसे उत्तर द्यायला शिका. ओबीसी भांडवल एकसंघ होत नाहीत, आता आपल्या या बांधवांचं काय होणार?ज्या आरक्षणावरती नोकरीच्या आशा होती ती आरक्षण सुद्धा एका बलाढ्य समाज काबीज करण्याचा प्रयत्न केले. या नैराश्यातून या बांधवांना स्वतःच्या आयुष्याचा शेवट केलेला आहे.
आपला ओबीसी रडणारा नाही लढणारा आहे. पण असो, पण माझ्या ओबीसी बंधू भगिनींनो कृपा करून आपले आयुष्य संपवणं हा उपाय कधीच नाही, लढून आपण आपले हक्क मिळवूच, तर त्यासाठी तुम्ही स्वतः जिवंत हवेत.
भावा तुझं हे बलिदान ओबीसी वाया जाऊ देणार नाही...
परत एकदा जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

