पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी “अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी” या विषयाअंतर्गत एक औद्योगिक भेट आयोजित केली असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी सांगीतले. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली. ही भेट लीना इंडस्ट्रीज, सोलापूर येथे पार पडली. ही कंपनी CNC Computer Numerical Control) व VMC (Vertical Machining Center) मशिनिंग जॉब वर्क या क्षेत्रात कार्यरत असून, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन कार्य करते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक मशिनिंग सुविधा प्रत्यक्ष पाहिल्या आणि CNC व VMC मशिन्सच्या कार्यप्रणालीबाबत सखोल माहिती मिळवली. उद्योगस्तरावरील प्रिसिजन मशिनिंग व गुणवत्ता मानकांचा वापर विद्यार्थ्यांना अनुभवता आला. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना स्वयंचलित यंत्रणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्योगात वाढता वापर याबद्दल मार्गदर्शन केले तसेच करिअरविषयक उपयुक्त सल्लाही दिला.
या भेटीद्वारे तज्ञांनी विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगाच्या वाढत्या गरजा, गुणवत्ता नियंत्रण, तसेच उत्पादन क्षेत्रातील इव्होल्यूशनवर सखोल चर्चा केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक मार्गदर्शनासोबतच त्यांना भविष्याशी संबंधित कौशल्ये विकसित करण्याची प्रेरणा मिळाली.
या औद्योगिक भेटीत विद्यार्थ्यांसोबत प्रा. ए. एस. अराध्ये, प्रा. एस. एस. साळुंखे तसेच श्री. व्ही. ए. नवले यांनीही सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने लीना इंडस्ट्रीज, सोलापूर यांचे मनःपूर्वक आभार मानले व अशा औद्योगिक भेटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक ज्ञान व औद्योगिक अनुभव यांतील दरी कमी करण्यास मदत झाली असून, विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान समृद्ध झाले आणि आधुनिक उद्योगाच्या पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे.

