पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे व स्पर्धेच्या वेगात विद्यार्थी टिकून राहावेत या दृष्टीने संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध डिजिटल सुविधा चे उद्घाटन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर यांच्यासह वाढदिवसानिमित्त प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या फेस रीडिंग मशीन चे उद्घाटन करण्यात आले.
त्याचप्रमाणे प्रशालेमध्ये सर्व वर्गामध्ये लावण्यात आलेल्या डिजिटल स्क्रीनचेही उद्घाटन करण्यात आले .तसेच प्रशालेच्या परिसरामध्ये सी सी कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच सर्व विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमाविषयीची माहिती ऑनलाईन दिली जात आहे .
ही सुविधा देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर ,उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सचिव ॲड .वैभवजी टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे,अनिरुद्ध सालविठ्ठल, दिलीपआप्पा घाडगे, विजय माळवदकर, सुनीताताई मोरे यांनी सहकार्य केले याबद्दल प्रशालेचे प्राचार्य डॉ. मुंढे यु.आर. पर्यवेक्षक पवार ए.ए. उपमुख्याध्यापक दराडे व्हि.एस., मुख्यलिपीक हनुमंत मोरे, ज्युनिअर विभाग प्रमुख चौगुले व्हि.डी.यांनी संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्य उपस्थित होते.

