श्री क्षेत्र पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सन्मा.सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे साहेब प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत साहेब लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवामध्ये चौथ पुष्प रामदास रोंगे आणि पौर्णिमा धुमाळे यांची शिष्या उदयोन्मुख गायिका प्रियांका क्षीरसागर यांनी गुंफले.सुरुवातीला सदस्य संभाजीराजे शिंदे,प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत मुकेश आणेचा आणि कलाकार यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीलाच अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये राग बिहाग मध्ये बंदिश गाऊन दुर्गा मधील तराणा सादर केला आणि वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करत घेई घेई माझे वाचे,नाम गाऊ नाम घेऊ,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,सावळा नंदाचा नंदन आदी सुंदर रचना गात शेवटी याती कुळ माझे गेले हरपून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तबला माऊली खरात.हार्मोनियम सुदर्शन कुंभार तर टाळ साक्षी क्षीरसागर यांनी केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले.यावेळी पंढरपूर कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे कर्मचारी यांनी अधिक परिश्रम घेत आहेत.

