सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षक हा समाजाचा कणा असून शिक्षकांमुळेच सामाजिक व देशाची प्रगती शक्य आहे असे गौरवोद्गगार लायन्स क्लबचे झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे यांनी काढले.
विजापूर रोड वरील ग्रीन वुड रिसॉर्ट सोरेगाव येथे शिक्षक दिन, अभियंता दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या आदर्श शिक्षक, आदर्श शाळा,अभियंता आदर्श शाळा पुरस्कार वितरण डिस्ट्रिक्ट चे रिजन १, झोन ५. चे झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे. शुभहस्ते करण्यात आले. आणि 'लायन्स क्लबला पहिली अधिकॄत भेट' होती.यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्षा लायन डॉ कॄष्णा राहुल चंडक, सचिवा लायन सौ नंदिनी मुकुंद जाधव, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, झोन सचिव लायन नागेश बुगडे, माजी अध्यक्ष इंजिनिअर लायन रविकिरण वायचळ आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी क्लबच्या अध्यक्षा डॉ सौ लायन कॄष्णा राहुल चंडक यांनी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत आणि प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून झाले. ध्वजवंदन माजी अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर लायन मुकुंद जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या परिचय इंजिनिअर लायन रविकिरण वायचळ यांनी केले.
यावेळी झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक, आदर्श शाळा, अभियंता आणि क्लबचे कौतुक केले.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार सौ निता सचिन सोमवंशी ( मुख्याध्यापिका श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम प्रि. प्रायमरी, प्रायमरी स्कूल सोलापूर),श्रीमती अलका विष्णू कांबळे ( २८ नंबर मनपा शाळा सोलापूर). आदर्श अभियंता पुरस्कार अभियंता श्री ज्ञानेश्वर ज्योतीराम घोडके, (सोलापूर), अभियंता श्री अनिल जाधव (सोलापूर), तसेच (आदर्श शाळा ( श्री धर्मा धुळप्पा कोरे मुख्याध्यापक श्री वीरतपस्वी बालक मंदिर मराठी प्राथमिक शाळा भवानी पेठ सोलापूर),शिक्षक, आदर्श अभियंता, आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शाल, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, बुके असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच लायन्स क्लब मधील शिक्षक लायन सोमशेखर भोगडे, एम जे एफ लायन डॉ राहुल चंडक, एम जे एफ लायन ममता बुगडे, इंजिनिअर लायन रविकिरण वायचळ झोन सचिव लायन नागेश बुगडे यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास लायन्स क्लब मेट्रो चे अध्यक्ष लायन विश्वनाथ आवटे, सचिव लायन विश्वनाथ आमणे, निमंत्रित, शिक्षक वॄंद,प्रतिष्ठीत लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम जे एफ लायन सौ ममता नागेश बुगडे यांनी केले तर आभार सचिवा लायन सौ नंदिनी मुकुंद जाधव यांनी केले.

