अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीराम ॲग्रीकल्चर कॉलेज येथे कृषीदूत विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत विद्यार्थ्यांनी विविध विभागांना भेट देऊन आधुनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना पिक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, तसेच सिंचन पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा, प्रात्यक्षिक प्लॉट्स व डेमो युनिट्स पाहून प्रत्यक्ष ज्ञान मिळवले. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना नव्या कृषितंत्रज्ञानाची ओळख झाली व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती गोळा करण्याची संधी मिळाली.
यावेळी कृषीदूत मंगेश क्षीरसागर, रामहरी डोंगरे, रोहन खरात, रणजित खटके, शंतनु माळी, चैतन्य राऊत, यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे . प्रा . एस. एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) प्रा एम एम चंदनकर ( कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले

