पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत तृतीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा टेंभुर्णी येथील शारदीय गुरुकुल स्कूलच्या मैदानावर पार पडली. १९ वर्षांखालील गटात झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमहर्षक होता. यावेळी एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या संघाने आपल्या सांघिक कौशल्याच्या जोरावर स्पर्धेतील अनेक अडथळे पार करत तिसरा क्रमांक पटकावला.
क्रीडा शिक्षक प्रवीण पिसाळ यांचे मार्गदर्शन संघाच्या यशासाठी मोलाचे ठरले. या उल्लेखनीय कामगिरीसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी आणि संस्थेच्या वतीने सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि आगामी स्पर्धांसाठी अधिक जोमाने तयारी करण्याचा निर्धार यावेळी संघाने केला.
जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेतील एमआयटी ज्यूनिअर कॉलेजचा विजयी संघ:उदय खरात, ओंकार लगड, पवन देशमुख, श्रवण इंगळे, वैभव मुळे, सूरज अग्रवाल, ओम उंडे, श्रेयस माने, प्रतिक गायकवाड, तन्मय होले, राकेश चौधरी, दिगंबर चव्हाण आणि श्रीयोग घोडके.

