पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
एक साधारण सिटी पोलीस मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवतो आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे करतात ते त्याहून अनपेक्षित असते.ताफा अडवल्यावर काय झालं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी काय केले असेल? होय...
झाले असे की...
सोलापूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.पण त्याचं हृदय अजूनही ठोके देत होतं आणि ते ठोके पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलच्या ICU मध्ये असलेल्या एका अनोळख्या रुग्णासाठी जगण्याचा आधार ठरणार होत..ते हृदय सोलापूर वरून हेलिकॉप्टरमधून पुण्याकडे आणलं गेलं.त्या रुग्णासाठी प्रत्येक सेकंद महत्वाचा होता.
कट टू 2015 पूर्वी महाराष्ट्रात एकही हार्ट ट्रान्सप्लांट झाले नव्हते कारण रहदारीमुळे विहित वेळेत हार्ट हॉस्पिटलमध्ये पोहचेल याची गॅरंटीच नव्हती. मुख्यमंत्री देवाभाऊंना हे माहिती पडल्यावर 2015 साली हार्ट ट्रान्स्प्लांटसाठी ग्रीन कॉरीडोरचे SOP ठरवले गेले आणि महाराष्ट्रातील पहिले हार्टट्रान्सप्लांट झाले त्यानंतर आजवर जवळपास 200 हून जास्त हार्ट ट्रान्सप्लांट झाले आहेत.
कट टू पुणे...
मुख्यमंत्री देवाभाऊंचा ताफा पुणे विमानतळावरून शहराच्या दिशेने निघाला होता.एका बाजूला मुख्यमंत्र्यांचा ताफा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णवाहिकेत ते हृदय घेऊन जाणारे डॉक्टर जे वेळेशी स्पर्धा करत होते.
सामान्यतः काय झालं असतं? VIP ताफ्याला प्राधान्य मिळालं असतं आणि रुग्णवाहिकेतल्या ह्र्दयाची धडधड थांबून एक जीव धोक्यात आला असता.पण पुणे ट्राफिक पोलिसांनी SOP नुसार रुग्णवाहिकेला प्राधान्य दिलं आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवला.
जेव्हा आपला ताफा का थांबवला हे मुख्यमंत्री देवाभाऊंना समजलं तेव्हा ताफा अडवणाऱ्या पोलीसांबाबत त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आणि सार्वजनिकरित्या मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीसांचे कौतुक केल. मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवणे हा योग्य निर्णय होता. प्रत्येक जीव मौल्यवान आहे. हाच आदर्श पुढे न्यायला हवा..असे त्यांनी सांगितले.
पण विचार करा, पुणे पोलिसांचा हा निर्णय दुसरे कोणी मुख्यमंत्री असते तर सहन केला असता का?
कदाचित VIP ताफा आधी निघाला असता. रुग्णवाहिका अडून राहिली असती आणि कदाचित त्या रुग्णाच्या जीवाचा धोका वाढला असता.पण देवाभाऊ आपल्या प्रत्येक कृतीतून वेगळे ठरतात.त्यांच्यासाठी पद, प्रोटोकॉल, वैभव यापेक्षा मानवी जीवन अधिक महत्त्वाचं आहे.
आपल्या याच संवेदनशील स्वभावामुळे ते जनतेचे लाडके भाऊ बनले आहे.. आज जेव्हा आपण मागे पाहतो, तेव्हा जाणवतं त्यांनी मानवी मूल्यांना दिलेलं प्राधान्य, आणि ‘मी नाही तर जनता प्रथम’ हा विचार करणारे देवाभाऊ..
आणि शेवटी पुणे पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे पण कौतुक केलेच पाहिजे त्यांना पण शाबासकी दिलीच पाहिजे.जसा प्रशासक तसे प्रशासन याचे उत्तम उदाहरण पुणे पोलिसांनी दाखवून दिले.त्यांचे पण धन्यवाद आणि देवाभाऊ तुम्हाला धन्यवाद द्यावे तितके कमीच तुमचे प्रत्येक निर्णय हे जनतेच्या भल्यासाठीच असतात.प्रत्येक वेळी तुमच्या कृतीने तुम्ही आमचं मन जिंकतात...