पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन १० मीटर पिस्टल शूटिंग स्पर्धेत पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्याल यातील विद्यार्थिनी कु. ऋतुजा धुमाळ हिने चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले.या उल्लेखनीय यशामुळे तिची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत यांनी अभिनंदन केले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. गजधाने , क्रीडा शिक्षक अनिल परमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कु. ऋतुजा धुमाळ हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या यशाबद्दल विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

