पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिह्यातील नद्यांना महापूर येवून व अतिवृष्टी होऊन शेतीपिके, घरे व जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने ताबडतोब ठोस मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या पंढरपूर येथील संघाच्या पदाधिकारी व सभासदांनी पंढरपूर तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.
मोठ्या प्रमाणात पुराने व अतिवृष्टीने शेतातील पिकां बरोबरच शेत जमीन सुद्धा वाहून गेली आहे. तसेच घरांची पडझड होऊन घरातील अनधान्य, भांडी, कपड़े, मौल्यवान वस्तू सह जनावरे व शालेय विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य देखील वाहून गेले आहे.तरि शासनाने त्वरित ठोस मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केली आहे.
यावेळी म. रा.पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके- पाटील, पंढरपूर शहर अध्यक्ष संतोष मोरे, ता. अध्यक्ष रवि कोळि, सचिव कुमार कोरे, प्रमोद भोसले, सुनिल अधटराव, संजय यादव व पत्रकार साळुंखे सह इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते