पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
सध्या पक्ष पंधरवडा चालू असून तसेच या कालावधीत व जे मरण पावले आहेत त्या व्यक्तींचा क्रिया कर्म अर्थात 10 दिवस हा चंद्रभागातील वाळवंटात जर चंद्रभागेला पाणी मोठ्या प्रमाणात आले तर दहाव्या दिवशीचे क्रिया कर्म हे उद्धव घाटावर करण्यात येते दहाव्या दिवशीचा नैवेद्य कावळ्यासाठी ठेवला जातो तो काक स्पर्श होण्याअगोदरच या ठिकाणी असलेला मोकाट पांढरा वळून हाच तो कावळ्यासाठी ठेवलेला नैवेद्य स्पष्ट करतो.
ज्यामुळे सध्यातरी कावळ्या ऐवजी दहाव्या दिवसाचा प्रसाद प्रथम हा मोकाट पांढरा वळू भक्षण करण्यास सुरुवात करतो हाच नैवेद्य खाण्यास कावळा स्पर्श करण्यात आल्यास त्यांनाही हुसकावून लावतो त्यामुळे क्रिया कर्म करण्यास आलेल्या लोकांना मानसिक मनस्ताप या मोकाट वळु मुळे सहन करावा लागत आहे. चंद्रभागातील वाळवंटाच्या कडेला मरण पावलेल्या व्यक्तीचा दहावा दिवस अर्थात पिंडदान करण्याकरता शहरातून तसेच ग्रामीण भागातून या ठिकाणी येतात आल्यानंतर अस्थिवर क्रियाकर्म केल्यानंतर त्याला नैवेद्य म्हणून दहीभात वगैरे दाखवला जातो हा दहीभाताचा नैवेद्य घाटावरील पायऱ्यावर कावळ्याने भक्षण करावा याकरता ठेवतात समोरच उभा असलेला वळू तो कावळ्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रसाद घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो त्यामुळे आधीच दुःखात असलेले अशातच या मोकाट जनावरांच्या व गाढवाच्या त्रासामुळे अधिक मानसिक त्रास समाधानाच्या ऐवजी सहन करावा लागतो.
मरण पावलेल्या व्यक्ती ला मोक्ष मिळावा याकरता या ठिकाणी दहाव्या दिवशी दहीभाताचा प्रसाद कावळ्यांसाठी ठेवला जातो परंतु कावळ्या अगोदरच हा मोकाट वळू स्वतःच तो आणि असं सुरुवात करतो व दबक्या पावलाने नंतर कावळे त्या ठेवलेल्या प्रसादाला परशु भक्षण करतात जोपर्यंत कावळा त्या पिंडाला अर्थात ठेवलेल्या दहीभातरुपी ठेवलेल्या प्रसादाला भक्षण करत नाही तोपर्यंत जी व्यक्ती मरण पावली आहे व क्रियाकर्मासाठी आलेले लोक काकस्पर्श अर्थात कावळा तो प्रसाद भक्षण करण्याची वाट पाहत थांबावे लागते कारण या ठिकाणी सध्या मोकाट गाढवे जनावरे गाई वहा मोकाट वळू च्या त्रासाला दुःखात असलेल्या लोकांना सामोरे जावे लागत आहे एखादी व्यक्ती या वळूश करण्याचा प्रयत्न केला तर तो थेट अंगावरच धावून जातो असा प्रकार अनेक वेळा या ठिकाणी घडला आहे.
या मोकाट वळसा व मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी दुःखी व क्रियाकर्म आलेल्या नातेवाईक वाळवंटात जमलेल्या नागरिक व भाविकांमधून मागणी होत आहे.

