मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
पण म्हणतात ना संकटाच्या काळात जेव्हा सर्व आशा मावळतात, तेव्हा काही व्यक्ती देवदूतासारख्या धावून येतात आणि जीवनाच्या अंधारात प्रकाश पसरवतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे देवाभाऊ.
त्यांच्या तत्परतेने अनेक चिमुकल्या जीवांना नवजीवन मिळाले आहे, आणि त्यातील एक प्रेरणादायी कथा आहे तीराची....एका सहा महिन्यांच्या बालिकेची, जिच्या जीवनात देवाभाऊंमुळे चमत्कार घडला.
सर्व काही सुरळीत चालले होते. तीरा जन्मली तेव्हा ती एक सामान्य, हसतमुख बाळ होती. पण हळूहळू आई-वडीलांना लक्षात आले की, दूध पिताना तिचा श्वास गुदमरतो, ती अस्वस्थ होते. घाबरलेल्या कुटुंबाने डॉक्टरांना दाखवले, आणि तेव्हाच त्यांच्यावर आभाळ कोसळले. डॉक्टरांनी सांगितले,
तीराला स्पाइनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) हा दहा हजार मुलांमागे फक्त एका मुलालाच होणारा दुर्मिळ आजार झाला होता. ती सहा महिन्यांपेक्षा जास्त जगू शकणार नाही. हे शब्द ऐकून आई-वडील स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची छोटीशी परी हसत खेळत असतानाही, ती कायमची सोडून जाईल ही कल्पना असह्य झाली. रात्री रडत काढल्या, दिवस चिंतेत गेले. पण आशेचा एक किरण दिसला, अमेरिकेतून मागवण्यात येणारे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन या आजारावर उपचार ठरणारे होत,पण एवढी मोठी रक्कम एका सामान्य कुटुंबासाठी विचार करण्यापलीकडे होत.पण त्या चिमुकलीसाठी क्राउडफंडिंग करून रकमेची जमवाजमव सुरू झाली.आणि त्यात भर म्हणजे ते इंजेक्शन भारतात आणण्यासाठी ६ कोटी रुपयांचा कर भरावा लागणार होता. इतकी प्रचंड रक्कम आणायची कुठून ? आधीच संकटांचा डोंगर डोक्यावर, त्यात या नव्या भाराने कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलं.
समाजमाध्यमातील, वृत्तवाहिन्यातील हा विषय आणि परिस्थिती देवाभाऊंना समजली. त्यांनी तातडीने, केंद्र सरकारशी संपर्क साधला, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यालयात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरोग्यमंत्री यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. त्यांचा अथक पाठपुरावा आणि पंतप्रधान कार्यालयाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे 6 कोटींचा कर माफ करण्यात आला. तीराच्या आई-वडिलांना मोठा दिलासा मिळाला, आणि ते इंजेक्शन वेळेत मिळाले. आज तीरा हसत-खेळत आहे, तिच्या कुटुंबात आनंद परतला आहे. देवाभाऊंमुळे केवळ एका बाळाचा जीव वाचवला नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाला नवजीवन दिले. हे खरेच देवदूतासारखे कार्य नाही का?
पण हे एकटे उदाहरण नाही. यापूर्वी वेदांत नावाच्या एका चिमुकल्याच्या वेळीही देवाभाऊंनी ४० लाख रुपयांची मदत करून त्याचा जीव वाचवला होता. असे असंख्य किस्से आहेत, ज्यात ते गरिबांसाठी, आजारींसाठी धावले. आरोग्यासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या..मोफत उपचार, रुग्णालयांची सुविधा, ज्यात गोरगरीबांना आधार मिळतो. वृद्धांसाठी ते थरथरणाऱ्या हातांचा भक्कम आधार झाले, तरुणांसाठी भावासारखे पाठीशी उभे राहिले. प्रत्येक संकटात ते लोकांच्या मदतीला येतात, त्यांच्या दुःखात सहभागी होतात आणि उपाय काढतात.
हे सर्व पाहता, विरोधक जेव्हा म्हणतात की देवाभाऊंनी 'मतांची चोरी' केली, तेव्हा हसू येते. होय, त्यांनी मतांची चोरी केली आहे. जनतेच्या हृदयात त्यांनी एक स्थान निर्माण केलं आहे, कारण त्यांनी अनेकांचे जीव वाचवले, आशा दिल्या, आणि आरोग्याच्या क्षेत्रात देवदूतासारखे कार्य केले. तीरा, वेदांत यांसारख्यांच्या कुटुंबांसाठी ते फक्त नेता नाहीत, तर देव आहेत. अशा व्यक्तींमुळे समाज मजबूत होतो, आणि मतं आपोआपच त्यांच्या पाठीशी उभी राहतात. देवाभाऊ, तुम्ही खरेच देवदूत आहात...
तुमच्या कार्याला सलाम!

