पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारून जेमतेम 45 दिवस पूर्ण होणार असून या आपल्या अल्पकालावधीमध्येच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी आपल्या पदाशी कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिकपणे राहून आपल्या सहकाऱ्यांना तसेच पोलीस पाटलांना सोबत घेऊन उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेली आहे.
गेली 45 दिवसांमध्ये पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी आपल्या सहकारी पोलीस अधिकारी व पोलीस पाटलांना सोबत घेऊन एका प्रकरणात अवघ्या दोनच तासांमध्ये एका लहान मुलाचा शोध घेऊन त्या मुलाला त्याच्या आई-वडिलाकडे स्वाधीन केले. तसेच दुसऱ्या एका प्रकरणांमध्ये वृद्धदृष्टी नसलेल्या आजोबांनाही त्यांच्या घरच्याकडे स्वाधीन केले.
गणेश उत्सव साजरा करताना ग्रामीण भागातील पोलीस पाटलांची व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन त्यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळांना परवानगी देतानाही त्यांनी गणेश मंडळांना मार्गदर्शन व सूचना केल्या तसेच त्यांनी पोलीस पाटील व गणेश मंडळांना गावात कायदा सुव्यवस्था व शांतता राहण्यासाठी प्रयत्न करावेत असेही सुचवले. गावात शांततेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना दिल्या गेल्या होत्या . त्यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकारी कडून वृक्षारोपण तसेच सामाजिक उपक्रम त्यामध्ये रक्तदान शिबिर लहान मुला मुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये चित्रकला वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची या पद्धतीचे उपक्रम गणेश मंडळाकडून राबविण्यात आले.तसेच गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते गणेश विसर्जनापर्यंत गणेश मंडळांना पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.
तसेच गणेश विसर्जन करताना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची डीजे मुक्त व डॉल्बीमुक्त तसेच नो लाइट्स व नो लेजर्स याची काटेकोर अंमलबजावणी केली होती त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच गणेश मंडळाच्या विसर्जन साजरे करताना चांगल्या पद्धतीचे सादरीकरण झाले तसेच ग्रामीण भागातील गावागावातील गणेश विसर्जन शांततेत पार पडले.
तेज न्यूज प्रतिनिधी पंढरपूर यांच्याशी बातचीत करताना पोलिस निरीक्षक घनवट म्हणाल्या की प्रत्येक गावात कायदा सुव्यवस्था शांतता राखण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांना व पोलीस पाटलांना सोबत घेऊन प्राधान्य देणार असल्याचे सांगितले तसेच कोणत्याही गावांमध्ये शांततेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेणार आहोत तसेच प्रत्येक गावातील जनता भयमुक्त वातावरणात राहील पाहिजे या गोष्टींना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे अगदी कमी कालावधीमध्ये पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी अवघ्या पंचेचाळीस दिवसांमध्ये आपल्या पदाशी कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या सहकाऱ्यांना व ग्रामीण भागातील पोलीस पाटलांना सोबत घेऊन चांगली कामगिरी पार पडलेली आहे असे ग्रामीण भागातील जनतेतून मत व्यक्त केले जात आहे.

