पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
नामदेव शिंपी समाज युवक संघ, हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार समारंभ नियोजन समितीच्या सूचने प्रमाणे नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण धोंगडे यांनी भाजप प्रदेश महामंत्री महाराष्ट्र राज्य विजय चौधरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नामदेव शिंपी समाज युवक संघाच्या वतीने हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार समारंभास उपस्थित राहणे विषयी विनंती निवेदन पत्र देण्यात आले आहे.अशी माहिती अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी दिली आहे.
यावेळी सदर समारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांना उपस्थित राहण्यासाठी नियोजन करू असे विजय चौधरी यांनी सांगितले.
लवकरच नामदेव महाराज यांचे वंशज हभप निवृत्ती महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.तरी समाज बांधवांनि या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धेश हिरवे यांनी केले आहे.

