खारेपाटण प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन, सर्वत्र शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्था (रजि),ठाणे या सामाजिक संस्थेच्यावतीने 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त उद्योगश्री. प्र. ल.पाटील ज्युनियर कॉलेज, खारेपाटण, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील प्राध्यापकांचा शाल, भेटवस्तू,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जनजागृती सेवा संस्था, ठाणे चे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, खजिनदार दत्ता कडूलकर, सेवानिवृत्त माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राजापूर शिक्षण विभाग, माजी उपाध्यक्ष रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढीचे भास्कर गुरसाळे, कलादिग्दर्शक,गायक, संगीतकार, निवेदक श्री. शशिकांत कांबळी उपस्थित होते.तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रविण लोकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. 2021 स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. विविध सेवाभावी संस्थांना आर्थिक मदतीचा हात नेहमीच या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. कोरोना काळात गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात जनजागृती सेवा मंडळ मार्फत देण्यात आला. संस्थेच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या सत्कार समारंभामध्ये ज्युनिअर कॉलेज खारेपाटण चे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सहाय्यक शिक्षक अजय गुरसाळे, दयानंद कोकाटे, अंकुश नाईक, संगाप्पा गुरव, सुरेश करांडे, रामचंद्र लोके, नितीन वरुणकर, भोलेनाथ कानागल, सुबोध देसाई, दिगंबर गुरखे, श्रीमती दीक्षा गुरखे, श्रीमती सारिका महिंद्रे, श्रीमती तबसूम काझी,श्रीमती दर्शना पाताडे, कु. गौरी सारंगे कु. श्रुतिका जांभेकर कु. सायली पालव आणि सेट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल ऋषिकेश सानप यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसुलकर, संचालक विजय देसाई सिनिअर कॉलेज प्राचार्य कांबळे सर प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. जनजागृती सेवा संस्थेच्या अभिनव उपक्रमाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अजय गुरसाळे यांनी केले.आणि आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांनी केले.

