गणपती विसर्जन होऊन पाच सहा दिवस होत आले तरी अजूनही रस्त्यावरील आणि मोक्याच्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि मंडळांनी लावलेले बॅनर्स तसेच लटकट ठेवलेले पाहायला मिळतात.मुंबई महानगर पालिकेने दोन दिवसात जवळपास सात हजार बॅनर्स काढले तरीही बऱ्याच ठिकाणी आजही बॅनर्स फ्लेक्स आहेत. आता नवरात्री आणि त्यानंतर लागलीच दिवाळी आहे त्यामुळे पुन्हा एकदा फलकबाजीचे पेव फुटेल.काही राजकीय पक्ष असे वागतात की संपूर्ण मुंबई त्यांना आंदणच दिलेली आहे.आता तर ठिकठिकाणी अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे आणि कार्यक्रमांचे फ्लेक्स लावले जातात आणि विशेष म्हणजे कार्यक्रम झाला तरी अनेक दिवस ते फ्लेक्स बॅनर्स तसेच असतात, आयोजक ते काढण्याची तसदी देखील घेत नाहीत.जाहिरातबाजीवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तो विधायक कामांवर कोणीही खर्च करताना दिसत नाहीत.मुंबई महानगर पालिकेच्या पूर्व परवानगीने बॅनर्स आणि फ्लेक्स त्यांनी नेमून दिलेल्या जागेवर लावायला हवेत.पण कोणीही उठसुट जिकडे जागा मिळेल तिकडे जाहिरात करताना दिसतात.
गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व

