पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिव्यांगाप्रमाणे सरसकट अडीच हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी पंढरपुरात तहसील कार्यालय येथे श्रावणबाळ माता-पिता सेवा सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थित आक्रोश मोर्चा काढून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्योग व व्यापार प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते राज्यातील निराधारांचे विविध प्रश्नाबद्दल व सामाजिक कार्याबद्दल तानाजी जाधव यांचा राष्ट्रवादीच्या वतीने पंढरपूर येथील कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनाथ बचुटे, संग्राम कापसे, रमेश फाटे, निवृत्ती भटकर, उमेश फाटे, बाळासो फाटे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना दिव्यांगाप्रमाणेच सरसकट २५०० अनुदान मिळावे, या मुख्य मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयावर 'श्रावणबाळ माता पिता सेवा सामाजिक संघटना' यांतर्फे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले होते. हजारो निराधार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहून शासन व प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य जाणवले. सामाजिक न्यायाच्या या लढ्याला यश मिळावे, निराधारांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळावे यासाठी तानाजी जाधव केलेल्या अथक प्रयत्नांमुळे शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले.
याच कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते तानाजी जाधव यथोचित सत्कार करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि न्यायासाठी चाललेल्या सातत्यपूर्ण लढ्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. जाधव हे खऱ्या अर्थाने समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नासाठी लढणारे हे नेतृत्व आदर्शवत आहेत. असे उद्गार यावेळी फाटे यांनी काढले.

