पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांना मौजे सोनंद ता. सांगोला नि. सोलापूर येथे हॉटेल मटन भाकरी च्या सिमेंट पत्राचे खोलीत इसम नाव सचिन साहेबराव काशिद रा. सोनंद ता. सांगोला व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ रा. आथणी जि. बेळगाव हे विनापरवाना जुगार क्लब चालवित आहेत अशी बातमी असून सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करणेबाबत आदेशीत करण्यात आलेले होते. त्यानंतर आम्ही सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर असे सांगोला पोलीस ठाणेस दि.२९/०८/२०२५ रोजी ठाणे दैनंदिनीस नोंद ४६/२०२५ नोंद करुन आमचे सह ४ पोलीस पथकाचे सोबत मौजे सोनंद ता. सांगोला जि. सोलापूर येथे जावून मटन भाकरी हॉटेल च्या पाठीमागील सिमेंट पत्रयाचे खोलीत अवैधरीत्या जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा कारवाई केली .
मौजे सोनंद ता. सांगोला जि. सोलापूर याठिकाणी सुरु असलेले मटन भाकरी, हॉटेलच्या पाठीमागील सिमेंटच्या पत्राचे शेडमध्ये ५० इसम हे ५२ पत्याचा पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत. तसेच कसिनो काउंटरमध्ये अवैधरीत्या बेकायदेशीर देशी-विदेशी दारु ही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आलेले आहेत.
सिमेंटच्या पत्रा शेड मध्ये पत्ते खेळण्याकरीता आलेल्या इसमांनाकडे दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रोख रक्कम, पत्यातील रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल, जुगार साहित्य, ५२ पानी पत्याचे डाव, पत्राशेड मध्ये असलेल्या खुर्ष्या, टेबल, कपाट पेटी, पत्याचे डाव असलेले बॉक्स, कुलर, पैसे मोजण्याची मशीन, त्यामध्ये १) रोख रक्कम १६,०९,४८०/- २) ६२ मोबाईल १३,९१,१००/-रुपये ३) २६ चारचाकी वाहनाची किंमत २,०९,०००००/- रुपये २) ६१ दुचाकी वाहनाची किंमत -२९,६०,०००/- रुपये ३) देशी विदेशी दारु किंमत ११,१६५/- रुपये असा एकुण २,६८,७२,१९५ /- रुपये (अक्षरी दोन कोटी अडुसष्ठ लाख बाहत्तर हजार एकशे पच्यान्नव रुपये) चा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस वरील ५० इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४,५ व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक , सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत गडळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि/विभावरी रेळेकर, पोसई/भारत भोसले, पोसई /अनिल पाटील, श्रेणी पोसई/दत्तात्रय तोंडले, पोह/१८६ निलेश रोंगे, पोह/८५ कामतकर, पोहेकॉ/१४१५ मंगेश रोकडे, पोह/३५३ सुजित उबाळे, पोह/१६९६ अरुण कोळवले, पोह/१२६ सातव, मपोहेकॉ/२८१ शितल राउत, मपोहेका /१८८६ शितल राउत, पोना /१५२७ संतोष गायकवाड, पोना/१३८३सिताराम चव्हाण, पोना/७२३ शिंदे, पोना/१०१३ ढोणे, पोकॉ/२०२० गुटाळ, पोकॉ/२११६ गवळी, पोकॉ/१४२३ राहुल लोंढे, पोकॉ/७९६ आवटे, पोकॉ/९७१ जाधव, पोकॉ/१०२२ मदने, पोकॉ/२११० हुलजंती, यांनी पार पाडलेली आहे.