पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळाली की तीन-चार लोक डॉक्टर म्हणून कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना उपचार करत आहेत अशा माहितीच्या आधारे मौजे रोपळे गावात पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता त्या ठिकाणी तीन व्यक्ती मिळून आले त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव गोविंदा देवी राम प्रजापती वय 26 वर्ष राहणार भरतपूर राजस्थान 2/ जाहीर खान वय 22 वर्षे राहणार पलवल जिल्हा राज्य हरियाणा 3/ आसिफ दिन मोहम्मद राहणार भरतपुर राजस्थान अशी तिघे व्यक्ती मिळूनआल्याने त्यांच्याकडे विचारपूस केली असता कुठल्याही वैद्यकीय अधिकृत डिग्री अथवा सर्टिफिकेट त्याच्याकडे मिळून आले नाही सदरची व्यक्ती हे डॉक्टर आहे अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करून उपचार करत असल्याचे निदर्शनास आलेले असून सदरचे तिन्ही लोकांच्या ताब्यातील सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंजेक्शन साठी वापरण्यात येणारे लहान मोठ्या औषधाच्या बाटल्या टॅबलेट्स व इतर साहित्य सर्व पंचनामा करून जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे सदर तिन्ही व्यक्ती विरुद्धअशी मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 1956 कलम 15 /2 व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट 1961 कलम 33 नुसार bns कलम 318/4/ 319/2/ 3/5प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीची राजस्थान हरियाणातील टोळी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले असून त्यांनी रोपळे गावातील या व्यक्तीशी बीड येथील राहणारा आरोपी सतीश सोळंकी याच्या मध्यस्थीने दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता शेतातील रूम भाड्याने घेऊन दिलेली होती त्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून वरील तिन्ही लोक डॉक्टर आहे अशी बतावणी करून त्या ठिकाणी लोकांना इंजेक्शन औषध गोळ्या देत होते.
सदर गुन्ह्यात वरील तिन्ही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी वरील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केलेली असून आणखीन दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत पंढरपूर तालुका पोलिसांकडून सर्व तालुक्यातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कुठल्याही डॉक्टरांची अधिकृत वैद्यकीय डिग्री सर्टिफिकेट असल्याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही तोतया डॉक्टर यांचे कडे उपचार करून आपले जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम शेठ वडणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्नील वाडदेकर ,पोलीस हेडकॉन्स्टेबल साजन भोसले, पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल घोंगाने चालक पोलीस कॉन्स्टेबल घाडगे नदाफ चाटे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.