भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य के डी शिंदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना आयुष्यातील खेळ आणि शिस्तीचे महत्व समजावून सांगितले.
यावेळी क्रीडा विभागाच्या वतीने सर्व शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना रणजीत दडस यांनी जीवनातील खेळाचे महत्व संघ भावना आणि देशप्रेम यावर प्रकाश टाकला.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी खोखो आणि कबड्डीचे मुला मुलींचे मैत्रीपूर्ण सामने खेळविण्यात आले.राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावचे उपसरपंच नितीन शिंदे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र लाले उपस्थित होते.
सर्व खेळाडूंच्या वतीने क्रीडा शिक्षक जी डी जमदाडे व कोकणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत विधाते यांनी व आभार प्रदर्शन एम एस माने यांनी मानले.सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेचे पर्यवेक्षक बेसिकराव , उपप्राचार्या श्रीमती मोरे उपस्थित होते.