सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही दिवसांपूर्वीच पोलीस पाटलांचे मानधन हे प्रत्येक महिन्याला करावे असे आदेश गृह विभागाला दिलेले होते परंतु सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे मानधन जून जुलै पोलीस पाटलांच्या खात्या वरती जमा झाले नाही.
सध्या ऑगस्ट महिना ही संपत आलेला असून गणेशउत्सव सण जवळ आलेला आहे त्यामुळे काल पोलीस पाटील संघटनेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत तसेच माढा तालुक्यातील पोलीस पाटलांच्या वाळू ड्युटी संदर्भात चर्चा केली.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नवीन VPDA प्रणालीमुळे मानधन जमा होण्यास उशीर होत असल्याचे सांगितले त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी सात दिवसाच्या आत प्रत्येक पोलीस स्टेशनकडे पोलीस पाटलांचे मानधन रोख स्वरूपात देण्यात यावे असे आदेश दिले तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माढा तालुक्यातील पोलीस पाटलांच्या वाळू ड्युटी संदर्भात लवकरच मीटिंग आयोजित करू असे आश्वासन दिले यावेळी पोलीस पाटील संघटनेचे दिलीप पाटील प्रशांत पाटील नानासाहेब शिंदे व प्रत्येक तालुक्यातील पोलीस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते.