सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत १५४ विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविले.मूर्तिकार शिवशंकर कुंभार व कला शिक्षक शैलेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १२ वर्षांपासून शाळेत हे उपक्रम राबवित असून यंदा तब्बल १५४ विद्यार्थ्यांनी मातीमधून सुंदर, आकर्षक व पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती घडवल्या.
माती स्वच्छ करणे, प्रमाणात पाणी मिसळून चिखल बनवणे, घट्ट करुन, पाट, आसनं,हात,पाय,पोट,सोंड, आदी शरिराचे अवयवांची आकार तयार करून घेणे, गणेश मूर्ती सारखे बनवणे, रंग संगती आदीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस मुख्याध्यापक रविशंकर कुंभार व पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले, या कार्यशाळेतून उद्याचे मूर्तीकार घडतील. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी याची जनजागृती करणे समाजासाठी दिशादर्शक ठरेल.
हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख शिवानंद पुजारी, विश्वराध्य मठपती, विठ्ठल कुंभार, विनायक कोरे, सूर्यकांत बिराजदार आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण शाळेत हरित गणरायाचा मंगलमय माहोल निर्माण झाला होता.