पुरंदर प्रतिनिधी तेज न्यूज श्याम जगताप
26 ऑगस्ट रोजी सकाळी पुरंदर तहसीलदार कार्यालय येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक समिती भिवडी यांच्यावतीने 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शासकीय जयंती महोत्सवा महोत्सव निमित्त शासकीय यंत्रणा व स्मारक समिती यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यात भिवडी येथील राजे उमाजी नाईक स्मारक परिसरातील स्वच्छता, रंगरंगोटी, मंडप, सजावट, येणाऱ्या जनसमुदायाच्या सुखसुई, ॲम्बुलन्स व्यवस्था आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण तसेच पुरंदर पंचायत समितीचे अधिकारी, इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्मारक समिती जयंती महोत्सव भिवडी अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवी खोमणे, गणेश पाटोळे, रामचंद्र नाईक, सुनील जाधव आदी बैठकीला उपस्थितीत होते.