पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथील संगणक अभियांत्रिकी विभागाने “आधुनिक माहिती तंत्रज्ञानातील प्रवाह ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ. ए. सी. अडमुठे यांचे स्वागत विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉ. ए. सी. अडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या व्याख्यानात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा आणि ब्लॉकचेन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर सखोल माहिती देण्यात आली. यामुळे उद्योगमान्य कौशल्यांची आवश्यकता तसेच भविष्यातील करिअर संधींचा आढावा विद्यार्थ्यांना मिळाला.
सदरील सत्रास द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुनम गवळी यांनी केले, तर आयोजन डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या उद्योगमान्य कौशल्यांचा विकास होईल, तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठा आधार मिळेल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.