वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्ग ११ विचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. याआधी महाराष्ट्रामध्ये महानगर पालिका क्षेत्रात ही प्रक्रिया राबविण्यात आली होती.ती महानगरामध्ये यशस्वी झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ती राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र ग्रामीण भागातील सोयी सुविधांचा अभाव म्हणून या शासन निर्णयाला सुरुवातीलाच पालक , विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षक संघटना कढून विरोध करण्यात आला होता.
असे असतानाही केवळ शासनाची आग्रही भूमिका म्हणून सर्व शैक्षणिक संस्थानी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात केली.
वर्ग ११ वीच्या ऑनलाईन प्रकियेमध्ये गुणवत्ता व आरक्षण या आधारावर ४ फेऱ्या आणि सर्वासाठी खुली ५ वी फेरी निश्चित करण्यात आली.वर्ग १० विचा निकाल दिनांक १३/०५/२०२५ ला लागला.सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना प्रवेशाची ओढ लागली असतानाच ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईलचा आणि इंटरनेटचा अभाव यामुळे पालक , विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला.मात्र शिक्षकांनी जीवाचे रान करून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतले .
मात्र आजपर्यंत प्रवेशाची ४ थी फेरी आटपून गेली तरी अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.शाळांनी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन केल्या नंतरही विद्यार्थी allotment करताना प्रत्येक शाळेच्या वाट्याला ३५% विद्यार्थीच allot करण्यात आले.
शासनाने वर्ग १० वीच्या बोर्ड परीक्षेत ४ विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ATKT ची सोय देऊन वर्ग ११ वीत प्रवेश देऊन त्याचे १ वर्षाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली.परंतु वर्ग अकरावीच्या (११) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अश्या ATKT पात्र विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही कारण इंग्रजी ,विज्ञान,मराठी, गणित या विषयामध्ये किमान ३५ गुणांची अट घालण्यात आली.
तर दुसरीकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या नावावर १०२ रुपये ३६ पैसे ऑनलाईन रजिस्ट्रेशन शुल्क आकारण्यात आले यातून केवळ सरकारी तिजोरीच भरण्यात आली.
अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नाही तर ते शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती निर्माण झाली आहे.
या सर्व बाबींचा विचार महाराष्ट्र सरकार,शिक्षण मंत्री यांनी जाणीवपूर्वक करावा आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत योग्य सुधारणा घडवून आणावी या प्रतीक्षेत पालक ,विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रतिनिधी म्हणून निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.
अमित प्रभाकरराव चिनेवार
कनिष्ठ महाविद्यालयिन शिक्षक.