विशेष लेख
खरंच संवाद हरवत चाललाय का..?
संवाद म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींमधील विचारांचे, भावनांचे, जाणिवांचे आदानप्रदान. तो शब्दांनी होतो, हावभावांनी होतो, डोळ्यांतून, मौनातून सुद्धा होतो.
जागतिक पातळीवर शब्दांनी संवाद साधायचा असेल, व्यापार करायचा असेल, संस्कृती वाचवायची असेल तर विचारांची देवाणघेवाण होणे गरजेचे आहे.त्यासाठी जास्तीत जास्त भाषा अवगत करणे कधीही हिताचे चं होते.
आज खरंच संवाद कमी होऊन विवाद जास्त होताना दिसत आहे.त्यामुळे नाजूक नात्यांमध्ये सुध्दा दुरावा निर्माण होऊ लागला आहे.चांगला संवाद व्हायचा असेल प्रथम पुढच्या ची भूमिका काय आहे...हे ऐकून घेण्याचा संयम ठेवावा लागतो.प्रामाणिकपणे व आदरपूर्वक भावनांची जिथे कदर होते तेथे अतिशय चांगला संवाद घडून येतो.त्यामुळे विश्वास परमोच्च बिंदू पर्यंत पोहचतो.. त्यामुळे नाते अखंडपणे चिरकाल टिकून राहते.
आज सोशल मीडियाच्या पिंजऱ्यात उभे असलेले लोक पिंजऱ्यात बसून खूप च्याव च्याव करताना दिसत आहेत.परंतू हे संवादाचे माध्यम नाही.आपल्या पिंजऱ्यातून बाहेर पडून... खरंच संवाद साधने काळाची गरज आहे.
आज अनेक लोक मोबाईल,रिल्स, टिव्ही मालिका व पेड न्यूज च्या मोह जाळात अडकत चालला आहे.स्वत: संवादाला पुढे न येता... अशा माध्यमावर विश्वास ठेवून.. तेथे जे दाखवले जाते..ते आपल्या वास्तविक जीवनात आले पाहिजे.. एवढ्याच विचारांत गुंग असतात...पण संवाद न करता तसेच झाले पाहिजे..या वादात लोक मोठ्या प्रमाणात अडकत आहे.त्यामुळे नाजूक नात्यात ही आज संवाद नसल्याने दूरावा वाढत चालला आहे.
पूर्वी लोक संवादाची पोळी खायला एकत्र यायचे म्हणून लोक गोळी पासून दूर होते....आता मात्र संवाद हरपला त्यामुळे गोळी शिवाय झोप येत नाही.... खरंच आपण शिक्षित होत चाललोय की अशिक्षित ही म्हणण्याची वेळ आली आहे..!
प्रा.आनंदा आलदर ✒️