पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचा नागेश फाटे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश ताड, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हनुमंत पाटील, बापूराव बागल आदी उपस्थित होते.