पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रममित जागांचे पट्टे वाटप दिनांक 2 ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेण्यात आला. यात अतीक्रमण असलेल्या कुंटुबाची यादी करुन, पात्र लार्भाथ्याचे अर्ज, सर्व आवश्यक कागदपत्रासह छानणी करुन, शक्ती प्रदत्त करुन छानणी करण्यात आली. हे कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचेकडे सादर करणेच्या सुचना देण्यात आल्या. तसेच सन २०११ पुर्वीपासुन अतीक्रमीत जागेवर रहात असलेबाबतचा पुराव्यासह लोकांनी अर्ज पंचायत समीतीकडे सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यात महसुल सप्ताह सुरु आहे. शनिवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रममित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम" तहसिल कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमावेळी तहसिलदार पंढरपूर सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी पंचायत समीती पंढरपूर, सर्व गांवाचे ग्रामसेवक, सर्व ग्राम महसुल अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी तसेच सन २०११ पुर्वीपासुन अतीक्रमण जागेवर रहात असलेले गांवातील गावकरी सदर कार्यक्रमणाला उपस्थित होते.
यावेळी सन २०११ पुर्वीपासुन रहीवासी प्रयोजनार्थ अतीक्रमण असलेल्या कुंटुबाची यादी करुन, पात्र लार्भाथ्याचे यांचे अर्ज, सर्व आवश्यक कागदपत्रासह छानणी करुन, शक्ती प्रदत्त करुन छानणी करुन, मा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचेकडे सादर करणेच्या सुचना देण्यात आल्या. तसेच सन २०११ पुर्वीपासुन अतीक्रमीत जागेवर रहात असलेबाबतचा पुराव्यासह अर्ज, पंचायत समीतीकडे सादर करणेबाबत लोंकाना आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.