पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘मराठी साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊंच्या लेखन प्रतिभेने ग्रामीण भागातील साहित्याचे दालन अधिक समृद्ध आणि देखणे केले कारण लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात आणि शाहिरीमधून सतत सकारात्मकता डोकावते. बालपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे आयुष्यातील केवळ एकच दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या साहित्यावर आज अनेकजण पीएच.डी.चे संशोधन करतात.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर हे मार्गदर्शन करत होते. सुरवातीला पालक शंकर कदम व प्रा. विलास शेळके यांच्या हस्ते साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, शाहिरी, पोवाडे, लावणी व ग्रामीण साहित्य यावर सविस्तर माहिती दिली. पालक शंकर कदम व प्रा. विलास शेळके यांनी देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत विचार व्यक्त केले.
यावेळी पालक यशवंत माने, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मनियार, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार,प्रवेश प्रक्रियेतील डॉ.करण पाटील, परीक्षा विभागाचे डॉ. सतीश लेंडवे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एस. पी. पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद, डॉ. बादलकुमार, प्रा. एस. ए.गरड, प्रा. बागल, प्रा. हल्लूर, प्रा. पारखे, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आदी उपस्थित होते.